HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीनंतर मुंडे बहिण-भाऊ पहिल्यांदाच एका व्यासपीठावर

बीड | विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आमने-सामने आले. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही नेते आज (१७ जानेवारी) श्रीक्षेत्र भगवानगड येथे संत वामन भाऊ हे ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त पारंपरिक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एका व्यासपीठावर आले आहे. यापूर्वी दरवर्षी पंकजा मुंडे व्यासपीठावर असतात. तर, धनंजय मुंडे हे पहाटेची पूजा करुन जातात. मात्र, यावेळी नव्यानेच पालकमंत्री बनलेल्या धनंजय मुंडे यांचीही हजेरी गहीनाथ गडावरच्या या जाहीर कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. यापूर्वी परळीमधल्या एका कार्यक्रमात धनंजय आणि पंकजा मुंडे हे दोघेही एकच आले होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, अध्यात्मिक ठिकाणावरून मी कधीही भाषणे करीत नाही परंतु गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी आपल्याला आज्ञा केल्यामुळे मी आपल्यासमोर उभा आहे. मंत्री म्हणून नव्हे तर वामन भाऊंचा भक्त म्हणून मी आपली आयुष्यभर सेवा करीन’, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंना टोला लगावला. पंकजा मुंडे यांनी गेल्या वर्षी भगवान गडावरील दसरा मेळावा निमित्ताने भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडेंनी यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केले होते. यावरून धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेला चिमटा काढला.

परळी विधानसभा निवडणूक पंकजा मुंडे-धनंजय मुंडे एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप केला. या मतदार संघता नेमके कोण विजयी होणरा याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल होते. निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडेंनी केज मतदारसंघातील प्रचारसभेदरम्यान बहिण आणि विरोधक माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या सभेनंतर याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामुळे परळीतील वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता. तेव्हापासून पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले नाही

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुका जाहीर झाल्याने ओबीसी नेते आक्रमक, छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

News Desk

महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या! सामनातून भाजपला इशारा

News Desk

गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती- देवेंद्र फडणवीस

News Desk