HW News Marathi
महाराष्ट्र

साकीनाका बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर औरंगाबादमध्ये वातावरण तापलं!

औरंगाबाद। मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. राज्यभरातून राजकीय नेते तसेच नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. औरंगाबादमध्ये भाजप महिला आघाडीच्या नेत्या तसेच कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या आहेत. भाजप महिला आघाडीकडून न्यू गणेश मंडळासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप नेते, महिला कार्यकर्त्या तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

रस्त्यावर उतरल्यामुळे या भागात मोठा पोलीसफाटा तैनात

मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर बलात्कार करुन त्याच्या खासगी भागांना इजा पोहचवण्यात आली. यातच या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात सगळीकडे खळबळ उडाली. या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चा आक्रमक झाला आहे. ही घटना घडताच आता औरंगाबादेत भाजपतर्फे मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्या तसेच इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी राज्य सरकार, पोलीस प्रशासन तसेच महिला अत्याचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. औरंगाबादच्या न्यू गणेश मंडळासमोर हे आंदोलन करण्यात आले. भाजप रस्त्यावर उतरल्यामुळे या भागात मोठा पोलीसफाटा तैनात करण्यात आला होता.

गणेशोत्सवसारख्या महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या धार्मिक सणामध्ये काल (10 सप्टेंबर) एक अत्यंत दुर्देवी आणि घृणास्पद घटना घडली. 9 आणि 10 सप्टेंबरच्या रात्री साधारण 3 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान साकीनाक्याच्या खैराणी रोड येथे पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीचा वॉटमनने कंट्रोल रुमला फोन करुन कळवलं की, तिथे एका बाईला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठवलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंचा इशारा, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल !

News Desk

जाणून घ्या…ST कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात कशी झाली वाढ?

News Desk

राजकीय हालचालींना वेग, कॉंग्रेस नेते अहमद पटेल आणि नितिन गडकरी यांची बैठक सुरू

News Desk