HW News Marathi
क्राइम

मुंबईत अनधिकृत तिकीट दलालांमुळं दहशतवाद्याचा प्रवास?

मुंबई | सहा दहशतवाद्यांपैकी मोहम्मद शेख याच्याकडे मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन, दिल्ली या प्रवासाचे ८०८ रुपयांचे तिकीट आढळले. हे तिकीट अनधिकृत तिकीट दलालाने दिले असून संबंधित तिकीट दलालास ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दहशतवाद्यांनी प्रमुख रेल्वे स्थानकांसह मुंबई लोकलची रेकी केली आहे. रेल्वे स्थानक आणि परिसरात कोणत्या ठिकाणी हल्ल्याची दाहकता अधिक प्रमाणात जाणवेल, याचा तपशीलदेखील जमा करण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई लोकल आणि प्रमुख रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशारा

उत्सवकाळात देशात घातपाताचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता मुंबई लोकल आणि प्रमुख रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अटक केलेल्यांपैकी एकाकडे एक्स्प्रेसचे तिकीट आढळले असून अनधिकृत तिकीट दलालांमुळे दहशतवाद्यांना रेल्वे प्रवास करता आल्याचे स्पष्ट झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह, मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला, अंधेरी, वांद्रे या स्थानकांवर अतिदक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई लोकलचा आवाका आणि लाखोंची प्रवासीसंख्या लक्षात घेता दहशतवादी हल्ल्यांसाठी रेल्वे नेहमीच ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरली आहे. १५ ऑगस्ट रोजी दक्षतेबाबत सूचना मिळाली होती. त्यानुसार वाढवलेला बंदोबस्त गणेशोत्सवात देखील कायम आहे, असे वरिष्ठ रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

30 हजारसाठी मुलाचे अपहरण

News Desk

दुस-या महिलेसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीवर हल्ला

News Desk

पुर्णा येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकी दरम्यान दगडफेक अनेकजण जखमी

News Desk