HW News Marathi
महाराष्ट्र

कृषी कायद्यात बदल होणं आवश्यक, दुरुस्ती विधेयक मांडा!

मुंबई। डी. वाय. पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला काही घटकांचा विरोध आहे. त्यामुळे कृषी कायद्यात दुरुस्ती करणं गरजेचं आहे. तसेच हे दुरुस्ती विधेयक लवकरात लवकर मांडण्यात यावे असं मत शरद पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केलंय. याबरोबरच शेतकऱ्यांच्या होणाऱ्या या आंदोलनावर देखील पवारांनी चिंता व्यक्त केलीये.

पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी हे दिल्लीच्या सीमांवर मागील सात महिन्यांपासून आंदोलन करतायेत. त्यांची भूमिका ही संतापजनक आहे. ते उठायला देखील तयार नाहीत. तसेच आता चर्चा करायलाही तयार नाहीत. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ दहा बैठका झाल्या. त्यात तोडगा निघाला नाही. त्यामुळे ते उठायला तयार नाहीत. त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते योग्य नाही. काल भाजपच्या लोकांनी तिथं गोंधळ घातल्याचं ऐकलं.

सरकारनं सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, असं सांगतानाच कृषी कायद्यात दुरुस्ती करणं गरजेचं आहे. असे देखील शरद पवार या उद्घाटनाप्रसंगी म्हणाले. त्यासाठी दुरुस्ती विधेयक सरकारनं आणलं पाहिजे. ते अधिक चांगलं होईल, असं पवार म्हणाले. तसेच दोन दिवसाच्या अधिवेशनात कृषी कायदा येईल असं वाटत नाही, पण आला तरी सगळ्यांशी चर्चा करून येईल असं मला वाटतं, असंही त्यांनी मत व्यक्त केलंय.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीतली चर्चा

या उद्घाटनाप्रसंगी पत्रकार परिषदेत शरद पवारांना असही विचारण्यात आलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीत कोणत्या चर्चा झाल्या यावर पवार म्हणाले या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. विकासकामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर डीडी कडून मिळालेल्या नोटिशी वरही यावेळी विचारण्यात आलं पवारांनी नकार देत यावेळी हा प्रश्न योग्य नाही असंही सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोहन डेलकरांच्या आत्महत्या प्रकरणाचा खोलापर्यंत तपास करून सर्व काही बाहेर काढू – उद्दव ठाकरे   

News Desk

… लोकांना उल्लू बनविण्याचे धंदे करत आहात!; जलीलांची राज्य सरकारच्या मराठी पाट्यांवर टीका

Aprna

“जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही”, शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Aprna