HW News Marathi
महाराष्ट्र

कृषी विद्यापीठात ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा गुणपत्रिकेवर मारला शिक्का !

पुणे | कोरोनाचे संकट आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव यामुळे देशात असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोणताही धोका नको म्हणून शाळा, महाविद्याल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द केल्या. मात्र, कोविड-१९मुळे ज्यांच्या परीक्षा घेतलेल्या नाहीत अशांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारण्याचा अजब प्रकार कृषी विद्यापाठात दिसून आला. यानंतर विद्यार्थी आणि पालक यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून असे काहीही आदेश देण्यात आलेले नाहीत. याबाबत चौकशी करुन कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी ‘झी २४ तास’ला दिली. तसेच, त्यांनी ट्विट देखील केले आहे.

 

कृषी विद्यापीठ दापोली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या चारही कृषी विद्यापीठांनी बी.एस्सी. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रमोट केले आहे. यात कृषी, उद्यान विद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी अन्न तंत्रज्ञान या शाखांच्या विद्यार्थ्यांना ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका वितरित केल्या जातील.

कृषी पदवी विद्यार्थ्यांना ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका देणे म्हणजे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा ह्रास आहे. यात अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. एकाच रांगेत सगळे विद्यार्थी गणले जातील. बी.एस्सी.नंतर एम.एस्सी.मध्ये प्रवेश अथवा मोठ्या संस्थांमध्ये नोकरीच्यावेळी ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका डाग लावणारी ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया अनिकेत पजई या विद्यार्थ्याने दिली असल्याची माहिती लोकमत वृत्तपत्रात दिली आहे.

राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय आला तर आपण न्यायालायत जाणार नाही. हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. तो सोडवला गेला तर जाण्याचा प्रश्न येत नाही. हा प्रश्न सुटणे महत्वाचे आहे. जी चूक झाली आहे, ती निदर्शनास आणून देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न संध्याकाळपर्यत सुटला अथवा तसे आश्वासीत केले तर न्यायालयात जावे लागणार नाही, असे असीम सरोदे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या आवाहनानंतर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांची वेगवेगळी भूमिका

News Desk

ज्या क्षणी ठाकरे सरकार सांगेल त्या क्षणी लोकल सुरु करण्याचं रावसाहेब दानववेंचं महत्त्वपूर्ण विधान!

News Desk

करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे… – कंगना रणावत

News Desk