HW News Marathi
महाराष्ट्र

सुजय विखेंनी रेमडेसिवीरचा साठा थेट दिल्लीतून आणला,राज्य सरकार काय करणार ?

अहमदनगर | कोरोना संकटकाळात महाराष्ट्रात आरोग्य सुविधांचा तुटवडा भासत आहे. अनेक राजकीय नेते आपल्या परीने लोकांची मदत करत आहेत. अशीच मदत अहमदनगरचे भाजप खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केली आहे. अहमदनगरमध्ये इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना भाजप खासदार डॉ सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा कोटा आणला आणि खाजगी विमान करुन रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली आहेत.दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या परवानगी शिवाय रेमडेसिविरचा साठा दिल्लीहून खरेदी करुन आणला आहे.

राष्ट्रवादीच्या भाषेत म्हणायचं झालं तर, २ दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी हा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. त्यानंतर त्यांनी आज सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती दिली. “ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस उशीर करत हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती” असं सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.

“माझ्यापरीने जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहोत, असं सुजय विखे म्हणाले. हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही”, असं सुजय विखे म्हणाले आहेत.

“मी गेलो फॅक्टरीत, तिथे मी माझ्या मैत्री संबंधांचा वापर केला, मदत घेतली आणि ही औषधं घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही. खासगी विमानाने ही औषधं आणतोय. माझ्या मनात पाप नाही, त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही”, असं सुजय विखेंनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरला ऑक्सिजन टॅंकर्स उपलब्ध करुन दिले आहेत. एकूणच काय तर प्रत्येक राजकारणी आपापल्या बालेकिल्यातील स्थिती सुधारताना दिसत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हाथरस प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे द्या, शिवसेनेची मागणी

News Desk

विरोधी पक्षात बसून ‘मळमळ’ ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती !

News Desk

जिल्हा वार्षिक योजनेतून किमान पाच टक्के निधी देण्यास मान्यता मिळाल्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये अधिक सुविधा देणे शक्य होईल! – वर्षा गायकवाड

Aprna