HW News Marathi
महाराष्ट्र

अहमदनगर दुहेरी हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक

अहमदनगर : जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची झाल्या नंतर या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. गोविंद गायकवाड यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांनीच हत्या केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी सायंकाळी बीड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात आणि राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात या दोघांवर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात योगेश आणि राकेश या दोघांचा मृत्यू झाला होता.

मृत्यू पुर्वी गोविंद गायकवाडने आपल्यावर गोळीबार केल्याचे राकेशने सांगितले होते. गोविंदला २ मे रोजी रात्री उशीरा पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादीच्या या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी पालकमंत्री राम शिंदे यांचे कार्यकर्ते उल्हास माने यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. कारण माने यांच्या तालमीतील पहिलवानांनी ही हत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता. या प्रकरणी गोविंदसह एका अल्पवयीन आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे दोघांची हत्या का करण्यात आली हे लकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायबर सिक्युरिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग! – उपमुख्यमंत्री

Aprna

“११ लोकांचा मृत्यू होऊन सुद्धा सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम अद्याप कायम”

News Desk

मातोश्री २ च्या डील बाबतही चौकशी व्हायला हवी – संजय निरुपम

News Desk