औरंगाबाद | महिला एकटी असल्याचे पाहून घरात घुसण्यास अज्ञान व्यक्तने प्रयत्न केला. त्या ५० वर्षीय महिलेने विरोध केल्याने महिलेला जिवंत जाळण्याचा प्रप्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे घडली. ही घटना रविवारी (२ फेब्रुवारी) रात्री ११ वाजतच्या सुमारास घडली असून या घटनेत महिला ९५ टक्के भाजली आहे. या पीडित महिलेवर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, पीडित महिलेचा ९५ टक्के भाजल्यामुळे काल (५ फेब्रुवारी) रात्री १० वाजता तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष सखाराम मोहिते याला अटक केली असून, त्याला १० फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित महिला घरात एकटी राहत होती.रविवारी गावातील महिला एकटी राहत असल्याचे पाहून आरोपी संतोष मोहिते हा तिच्या घरी आला. त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी संतोषने पीडित महिलेस मारहाण करून रॉकेल ओतून पेटवले व घराची कडी लावून पळून गेला. महिलेने आरडाओरडा केल्याने तिच्या शेजाऱ्यांनी तिथे जात आग नियंत्रणात आणली व पीडितेला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.