HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणेंकडून करारा जवाब!

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल (२४ ऑगस्ट) अटक करून त्यांना जमीन देखील देण्यात आला आहे. त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. राणेंच्या अटकेमुळे राणेपुत्र चांगलेच खवळले असून शिवसेनेला थेट इशारा देत आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. तर, नितेश राणेंनी थेट इशाराच दिला आहे.

करारा जवाब मिलेगा… करारा जबाव मिलेगा

नितेश राणे यांनी राजनीती चित्रपटातील एक विडिओ शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नारायण राणेंच्या सुटकेनंतर भाजपा नेते आणि राणे समर्थक यांनी जल्लोष केला. तर, राणेपुत्रांनी शिवसेनेला थेट इशाराच दिला आहे. आमदार नितेश राणे यांनी राजनिती चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत मनोज वाजपेयी यांचा डायलॉग आहे. आभाळाकडे थुंकणाऱ्याला कदाचित हे माहिती नाही की, ती थुंकी त्याच्यावरच पडणार आहे, करारा जवाब मिलेगा… करारा जबाव मिलेगा…. हा डायलॉग आहे. नितेश यांनी हा व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला थेट इशारा दिला आहे.

औकात कळली??

निलेश राणे यांनीही त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “काल पूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली, महाराष्ट्रासाठी नाही राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचा मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी टोकाचे प्रयत्न करून सुद्धा आमचं काही उखाडू शकले नाही. औकात कळली??”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुमारे एक तास सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद जवळपास पाऊण तास चालला. त्यानंतर 15 मिनिटांनी न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांचा जामीन मंजूर केला. नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. महाड पोलिसांनी नरायण राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे.

४ अटींवर जमीन मंजूर

नारायण राणे यांना कोर्टाने तीन अटींवर जमीन केला आहे.

– राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

– त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे.

– राणे यांना 7 दिवस आधी नोटीस दिली जाईल

– 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापुरात डेंग्युचा दुसरा बळी

News Desk

पवारांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका, – अमोल कोल्हे

News Desk

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

Aprna