HW News Marathi
महाराष्ट्र

एअर इंडियाला येणार ‘अच्छे दिन’?; सरकारने टाटांची बोली स्वीकारली, लवकरच होणार मालकी हस्तांतरण

नवी दिल्ली। तोटयात असलेल्या ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली सर्वश्रेष्ठ बोली सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळेच आता एअर इंडिया कंपनीची मालकी पुन्हा एकदा जवळजवळ सात दशकांनंतर मूळ मालकांकडे जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने ‘टाटा’च्या बोलीला मंजूरी दिल्याचं सांगण्यात येत आहे.

‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी वेगवेगळ्या चार निविदा सरकारकडे आल्या होत्या. तरी सर्वाधिक बोली लावणारी ‘टाटा सन्स’ या स्पर्धेत आघाडीवर होते. ‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही निविदा दाखल केली होती. मात्र सर्वश्रेष्ठ बोली लावणाऱ्या टाटांकडे एअर इंडियाचा कारभार सोपवण्यात येणार आहे हे आता स्पष्ट झालंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलेवर सामूहिक बलात्कार , दोघाना अटक

News Desk

पालघरला 28वा रस्ता सुरक्षा सप्ताह जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुरू

News Desk

दाभोळकर-पानसरे कुटुंबियांना उच्च न्यायालयाने सुनावले

News Desk