HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या पुण्यातल्या समारंभात भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा!

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवी उपस्थित असलेल्या भामा आसखेड योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात आज गोंधळ पहायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या घोषणाबाजीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर दिले. या सर्व प्रकारामुळे भामा आसखेड योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमास कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने गालबोट लागले आहे. पुण्याच्या‌ पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने भामा आसखेड पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. या योजनेचे काम तब्बल आठ वर्षानंतर नुकतेच पूर्ण झाले आहे. या‌ योजनेचे काम पूर्ण झाल्याबरोबर कामावरून भाजप व राष्ट्रवादीमध्य श्रेयवाद सुरू झाला.

गटनेत्यांच्या बैठकीत अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा प्रस्ताव मंजुर केल्यानंतर पुन्हा भाजपने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा प्रस्ताव देऊन तो मंजुर करून घेतला. यातून मार्ग काढत दोन्ही नेत्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिका भवनाच्या परिसरात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली. हे कमी की काय म्हणून नेत्यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी घोषणायुद्ध करत राडा घातला.

देवेंद्र फडणवीस सभागृहात येऊन बसल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पायऱ्या चढत सभागृहात पोहचले. अजित पवार वर येत असल्याची चाहुल लागताच सभागृहाच्या‌ प्रवेशद्वाराजवळ भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी “पुण्याची ताकद, गिरीश बापट, मोदी मोदी, देवेंद्र फडणवीस‌ तुम आगे बडे” अशा घोषणा देण्यास‌ सुरूवात केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी “एकच वादा, अजित दादा” अशा घोषणा दिल्या. यावेळी अजित पवार यांनी घोषणा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना झापले. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच होती. या घोषणाबाजीतच अजित पवार यांनी सभागृहात प्रवेश केला.

अजित पवार सभागृहात गेल्यानंतर मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध भडकले. दोन्ही ग्रुप घोषणाबाजी‌ करत एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले. सभागृहात लोकार्पण सभारंभ रंगलेला असताना, बाहेर मात्र घोषणाजीमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती चिघळू नये म्हणून दोन ग्रुपमध्ये मध्ये पोलिस कर्मचारी उभे होते. यावेळी पोलिस आणि पालिकेचे सुरक्षा कर्मचारी यांची चांगलीच दमछाक झाली. कार्यक्रम संपेपर्यंत सभागृहाबाहेर घोषणाबाजी सुरूच होती. पुणेकरांना दिलासा देणाऱ्या योजनेच्या लोकार्पण सोहळ्याला कार्यकर्त्यांच्या घोषणायुद्धाने गालबोट लागले आहे. आथा याचे पडसाद का उमटणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मागासवर्ग आयोगाने वानखेडेंची चौकशी करणारी एसआयटी रद्द करण्याचे दिले आदेश

Aprna

#CoronaVirus : आजपासून पुण्यात तीन दिवस बाजारपेठा बंद, तर घरोघरी जाऊन करणार सर्वेक्षण

swarit

निपाणीजवळील तवंदी घाटात भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू

News Desk