HW News Marathi
Covid-19

सीरमच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी, नव्या वर्षात केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वॅक्सिन एक्सपर्ट पॅनेलने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) मान्यता देण्याची शिफारस केली आहे. ब्रिटन आणि अर्जेंटिनानंतर ऑक्सफोर्ड लसीला मान्यता देणारा भारत तिसरा देश आहे.

ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपनीनं विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीला मान्यता मिळाली आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या आपत्कालिन वापराला मंजुरी मिळाली आहे. तज्ज्ञांच्या समितीने हिरवा कंदील दाखवला. या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे. मंगळवारी (29 डिसेंबर) ब्रिटनने ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता दिली. त्यानंतर भारतातही या लसीला मान्यता देण्याच्या हालचाली सुरु होत्या. ही भारतातील पहिली लस ठरली. तसेच, उद्यापासून देशात ड्राय रनला देखील सुरुवात होणरा आहे..महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या जिल्ह्यांत ड्राय रन होणार आहे…

कोविशिल्ड या कोरोना लसीनं तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहे. चाचण्यांदरम्यान ही लस 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली होती. मात्र, महिनाभराच्या अंतरानं या लसीचे 2-3 डोस घेतल्यास ही 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरते, असं सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावालांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, या लसीचे जवळपास ५-६ कोटी डोस तयार असल्याचेही पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होते..आणि परवानगीची वाट पाहत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं…

‘कोविशिल्ड’ ची किंमत काय असणार?

पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटच कोविशिल्डचं उत्पादन करत आहे. सीरममध्ये कोविशिल्डचे कोट्यवधी डोस तयार होणार आहे. सीरमचे सीईओ अदर पुनावालांच्या म्हणण्यानुसार ही लस सरकारला 200 ते 250 रुपयांपर्यंत मिळू शकते, तर खासगी विक्रेत्यांना ही लस 500 ते 600 रुपयांपर्यंत मिळू शकते. मात्र, तुम्हाला ही लस घेण्यासाठी खिशातील एकही रुपया खर्च करण्याची गरज भासण्याची शक्यता कमी आहे. कारण, कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारकडून प्रत्येकाला ही लस मोफत दिली जाणार आहे.

पंतप्रधान मोदींकडूनही कोविशिल्डची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात सीरमला भेट दिली. या भेटीत पंतप्रधान मोदींनी लसीबद्दलची सगळी माहिती घेतली. किती प्रमाणात उत्पादन सुरु आहे? लस किती प्रभावी ठरु शकते? लस साठवण्यासाठी काय करावं लागेल? लसीकरण कार्यक्रम राबवताना सीरमची कशी मदत होईल? याबाबतची सगळी माहिती पंतप्रधान मोदींनी घेतली. त्यानंतरच सीरमच्या लसीला सर्वात आधी मान्यता मिळेल ही शक्यता वर्तवली जात आहे.

जगभरात एवढ्या लसी तयार झाल्या आहेत, त्यांच्यापैकी अनेक लसी तिसऱ्या टप्प्यातही यशस्वी ठरल्या आहे, मग कोविशिल्डला मान्यता देण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. कोविशिल्ड या लसीचं उत्पादन पुण्यात होत आहे, त्यामुळं भारतात तिची वाहतूक सहज शक्य आहे, त्यामुळं वाहतुकीचा खर्च वाचणार आहे. शिवाय कोविशिल्डला अतिथंड तापमानाची गरज लागत नाही. इतर लसींची उणे 40 ते 50 अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानात साठवण करावी लागते, आपल्याकडे प्रत्येक भागात ही क्षमता अजूनतरी नाही. मात्र, त्याचवेळी कोविशिल्ड ही लस सहज साठवता येऊ शकते. आणि कोविशिल्ड ही लस निवडण्याचं तिसरं कारण आहे किंमत, या लसीची किंमत अतिशय कमी आहे. अवघ्या 500 ते 600 रुपयांना ही लस मिळणार आहे. जगातील इतर लसींशी तुलना केली तर ही किंमत नाममात्र आहे. त्यामुळंच कोविशिल्डला सरकार प्राधान्य देण्याच्या विचारात आहे.

कोरोनाची लस घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे. या बुकिंगनंतर तुम्हाला तुमच्या घराजवळचा बूथ दिला जाईल. यासाठी सरकारतर्फे महालसीकरण अभियान सुरु केलं जाईल. यामध्ये दर 2 किलोमीटरच्या अंतरावर लसीकरणं बूथ उभारले जातील. बुकींग केल्यानंतर तुम्हाला लसीकरणाची वेळ आणि बूथचा पत्ता SMS केला जाईल. यानुसार तुम्ही लसीकरण बूथवर जाऊन लस घेऊ शकता.

लसीकरण बूथवर 3 खोल्या असणार आहेत, पहिल्या खोलीत तुमची सगळी कागदपत्र तपासली जातील. ज्यामध्ये तुमचं ओळखपत्र आणि इतर कागदपत्र असतील. एकाच व्यक्तीनं दोनदा लस घेऊ नये, आणि प्रत्येक व्यक्तीची नोंद करता यावी यासाठी ही नोंदणी असेल. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या खोलीत तुम्हाला लस दिली जाईल. लस दिल्यानंतर तुम्हाला ऑब्जरवेशन रुममध्ये पाठवलं जाईल. जिथं तुमच्यावर 30 मिनिटांपर्यंत लक्ष ठेवलं जाईल. लसीचा काही साईड इफेक्ट झालाच तर तातडीनं वैद्यकीय उपचार दिले जातील, नाहीतर तुम्हाला घरी सोडण्यात येईल. पहिल्या लसीनंतर पुन्हा 28 दिवसांनी दुसरी लस घेण्यासाठी यावं लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार

News Desk

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण

News Desk

पंतप्रधान जगातील १०० देशांच्या राजदुतांसह पुण्याच्या सीरम इन्स्टीट्युटला भेट देणार

swarit