HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या अजित पवारांच्या घोषणेवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे. .महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे.

Related posts

मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ ईडीच्या कार्यालयाबाहेर थांबणार

News Desk

नाणार प्रकल्पावर उद्धव मुख्यमंत्र्यात गुफ्तगु

Ramdas Pandewad

…म्हणून उध्दव ठाकरे यांनी केला राज ठाकरे यांना नमस्कार!

News Desk