HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीकडून ऑफर आल्यानंतर शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांची पुन्हा भेट!

सातारा | ‍ साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना राष्ट्रवादीची ऑफर आल्याची माहिती येत आहे. असे असताना शिवेंद्रराजे यांनी काल पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. पालिका निवडणुकीत शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत आले तरच त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे पॅनेल होईल, असे सुतोवाच आमदार शशिकांत शिंदे यांनी केले होते. त्यांच्या या सूचक वक्तव्यानंतर त्यांची अजित पवारांशी झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पण, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. सातारा-जावलीतील विकासकामांच्या संदर्भातच ही भेट असल्याचे शिवेंद्रराजेंनी सांगितले.

सातारा-जावलीतील विविध विकासकामांच्या निमित्ताने आ. शिवेंद्रराजे भोसले सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेत आहेत. सध्या शिवेंद्रराजे भाजपमध्ये असले तरी त्यांची पहिल्यापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक आहे. या माध्यमातून ते विविध विकासकामे मार्गी लावून त्यांनी मोठ्याप्रमाणात निधी आणण्याचा सपाटा लावला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शशिकांत शिंदेंनी सातारा पालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवेंद्रराजेंना राष्ट्रवादीत येण्याची अप्रत्यक्षपणे ऑफर दिली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारांचा शब्द अंतिम असतो. शरद पवारांचा होकार येईपर्यंत काहीही खरे नसते. विविध विकास कामांच्या निमित्ताने शिवेंद्रराजे नेहमीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटत असतात.

त्यामुळे त्यांना सातारा-जावली मतदारसंघातील विविध विकास कामांच्या निमित्ताने अजित पवारांना भेटायचे होते, त्यामुळे त्यांनी अजितदादांकडे वेळ मागितली होती. त्यानुसार शिवेंद्रराजेंनी बुधवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात भेट घेतली. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांकडून शिवेंद्रराजेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर मिळाली असतानाच अजित पवारांशी त्यांची झालेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

शिवेंद्रराजेंनी ही भेट विकासकामांच्या संदर्भात होती. नियोजन समितीच्या बैठकीस मला उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे सातारा-जावलीतील विविध विकासकामांच्या निमित्ताने ही भेट होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या २४ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊसचा इशारा

News Desk

 ‘जनता प्रचंड अस्वस्थ आहे, चिडली आहे त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून लॉकडाऊनची भिती दाखवली जात आहे’, मनसेचा मुख्यमंत्र्यावर घणाघात

News Desk

पार्थ प्रकरणानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीला..

News Desk