सोमेश्वरनगर | विधानसभेच्या निवडणुकीत सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांनी केली असून, सुमारे सोळा हजारांच्या भव्यदिव्य फरकाने विजयश्री बहाल करत सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले आहे. दरम्यान, भाजपने पराभव निश्चित असतानाही लढाईत उतरून विरोधकांची भूमिका वठविली आहे. ‘इतक्या प्रचंड मतांनी माझा पॅनेल निवडून द्या की मतांच्या ओझ्याने मी वाकलो पाहिजे’ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांनी शब्दशः खरे केले आहे.
मी फोन बिन करणार नाही,…
मात्र, शेवटच्या टप्प्यात त्यांनी राष्ट्रवादीशी युती केली. शिवाय कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी आघाडीधर्म पाळत मनापासून साथसोबत केली. यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली. तसेच, कारखान्यात बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण या चारही कार्यक्षेत्रात पवारांना मानणारे आमदार असल्याने विजयाच्या मताधिक्याचीच चर्चा होती. ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी एकतर्फी होणार, अशीच चिन्हे कायम होती. अशात काकडे गटाने शेतकरी कृती समितीद्वारे स्वतंत्र अर्ज दाखल केले.अजित पवार यांनी प्रचाराच्या प्रारंभापासून, ‘नाराज मंडळींनी रूसू-फुगू नये. मी फोन बिन करणार नाही,’ असे सुनावले होते. ‘भविष्यात काहींना अन्य ठिकाणी संधी आहेत,’ असेही आश्वासन दिले होते.
तसेच, साखर उतारा, गाळप, तांत्रिक क्षमता उजवी ठरली, हे वास्तव आहे. आजूबाजूला ‘खासगी’ जोमात वाढत असताना सोमेश्वरच्याही साखर, डिस्टिलरी, कोजनरेशन युनिटच्या विस्तारीकरणाचा विकास हाती घेतला. त्यामुळे सभासद समाधानी होते. अजित पवार यांनी याच मुद्द्यावर प्रचार करत अडचणीत आलेल्या कारखान्यांची उदाहरणे देत अगदी स्वतः सभासद असलेल्या छत्रपती कारखान्यालाही फटकारले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.