HW News Marathi
महाराष्ट्र

आमदारांची साद अन् अजित पवारांचा प्रतिसाद, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यासाठी मोठी घोषणा

मुंबई | मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात अनेक आमदारांनी आमच्या जिल्ह्यात धरण द्या, अशी मागणी राज्याच्या सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांच्या आमदारांनी केली होती. मात्र, कोरोना काळात यामध्ये बदल झाले होते. या बदलांमुळे आमदारांनी त्यांच्या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय द्या, अशी मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभाग १२ जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयं सुरू करण्याच्या प्रस्तावावर काम करत होते. आज (८ मार्च) विधानसभेत अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आमदारांच्या मागण्या मान्य झाल्याचे दिसून येत आहे.

अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील सातारा, सिंधुदुर्ग, रायगड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा केली. कोरोना संकटामध्ये आरोग्य सेवांसाठी ७५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. सातारा, अलिबाग आणि सिंधुदुर्गमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी पाटील आहे, राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण …! – चंद्रकांत पाटील

Aprna

विरोधी पक्षांतील नेत्यांनाही वाटते, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत !

News Desk

मुंबई महापालिका झाली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी!

News Desk