मुंबई | उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता पुर्णपणे कोरोनातून बरे होत अजित पवार कामावर रुजू झाले आहेत. अजित पवारांनी कामासाठी पुनरागमन केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाईव्ह करत अजित पवार पुन्हा जोमाने कामास लागल्याचं दाखवलं आहे. यात अजित पवार काही फाईलींवर सह्या करताना दिसले. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी आपल्या खुर्चीपासून बरंच अंतर ठेवलं असल्याचं लाईव्हमध्ये दिसत आहे. कोरोना काळात अजित पवार यांनी सोशल डिस्टन्स पाळलेले सगळ्यांनीच पाहिले आहे. दरम्यान, आता देखील सोशल डिस्टन्सचे पालन करणे, सर्व नियम पाळत अजित पवारांनी धडाक्यात कामाला सुरुवात केली आहे.
कोरोना काळात देखील अगदी भल्या पहाटेपासून पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांनी ठिकठिकाणी धडक देत कामाची पाहणी केली होती. त्यामुळे स्पष्ट वक्त असलेल्या अजित पवारांना धडाकेबाज निर्णय घेणारा नेता म्हणून ओळखलं जातं याचं प्रचिती येत होती. याकाळात त्यांनी योग्य ती खबरदारी घेऊनच ते भेट घेत असल्याचं दिसून आलं होतं. २६ ऑक्टोबरला अजित पवारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आणि २ नोव्हेंबरला ते कोरोनामुक्त होत घरी गेले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.