HW News Marathi
महाराष्ट्र

“हॅलो, अजित पवार बोलतोय…”, आमदार निलेश लंकेंना अजित पवारांनी फोन करत दिला मोलाचा सल्ला

पारनेर | राज्यात कोरोनाचा वाढता कहर पाहता आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत दिवसागणिक भर पडत आहे. असात सध्या राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या कार्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. निलेश लंके यांनी भाळवणी येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आरोग्य मंदिर उभारलं असून याठिकाणी कोरोनाग्रस्तांसाठी ११०० बेड्स उपलब्ध करून दिले आहेत. इतकचं नाही तर स्वत: आमदार निलेश लंके याठिकाणी उपस्थित राहून घरच्या माणसाप्रमाणे लोकांची काळजी घेताना दिसत आहेत. त्यांच्या या कार्यांचा आढावा काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी घेतला होताच. आता अजित पवारांनाही त्यांच्या या कामाची दखल घेतली आहे.

सध्या निलेश लंके यांचे व्हिडीओ, बातम्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. कोरोना सेंटरमध्येच आमदार निलेश लंके जेवण करतात. तिथेच राहतात. सगळ्या लोकांची आपुलकीने काळजी घेतात. निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंकेंना फोन केला आणि त्यांची विचारपूस केली आहे.

हॅलो, मी अजित पवार बोलतोय, निलेश कसा आहेस…अरे बाबा तू स्वत:ची काळजी घे. रुग्णांची सेवा करतोय हे वाचून,व्हिडीओ पाहून आनंद वाटला. पण स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नको, काळजी घेत जा, आणि काही लागलं तर फोन कर असा मोलाचा सल्ला अजितदादांनी आमदार निलेश लंकेंना दिला आहे.

निलेश लंके यांच्या कामाचं शरद पवारांनीही केलं कौतुक

भाळवणीच्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहे. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणं, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामं ते करताना दिसतात. याशिवाय या ठिकाणी असलेल्या लोकांना पौष्टीक आहारदेखील पुरवला जातो. तसंच दिवसातून दोन वेळा रुग्णांची तपासणीही केली जाते. त्यांच्यासाठी योग, काही सांस्कृतिक कार्यक्रमही याठिकाणी आवश्यक ती काळजी घेऊन राबवले जातात. लंके यांच्या या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून त्यांना मदतीचा ओघही सुरू झाला आहे. पहिल्या लाटेतही त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी उभारलेल्या कोविड सेंटरची दखल शरद पवार यांनी घेतली होती.

कोविड सेंटरसाठी परदेशातून मदतीचा हात

प्रत्येक रूग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बाटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जात आहे. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वापरण्यासाठी गरम पाणी. सकस जेवण. दूध, अंडी, सूप आदींचा समावेश यामध्ये आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक काढे दिले जात आहे. निलेश लंके यांनी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसमावेशक मदत घेऊन, वर्गणी आणि देणगीतून हे कोविड सेंटर उभारलं आहे. तसेच निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही आर्थिक मदत मिळत आहे.

आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे. इतकेच नाही तर काही परदेशी नागरिकांनी देखील निलेश लंके प्रतिष्ठानच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. केवळ परदेशातून १ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक मदत निलेश लंके यांना मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : ‘लॉकडाऊन’चे पालन केले नाही, दिसताक्षणी गोळी मारण्याचा निर्णय घ्यावा लागेल !

swarit

PandharpurElection : फडणवीसांवर इतका अविश्वास दाखवणं बरं नाही, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

News Desk

शेतकऱ्यांना नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलून द्या – नितीन राऊत

News Desk