HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

अजितदादा, आपण इतकी वर्ष उगाच वेगळे राहिलो !

पुणे | अजितदादा, आपण इतकी वर्ष उगाच वेगळे राहिलो, अशी खंत वजा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवभक्तांशी संवाद साधताना बोलून दाखवली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांसह अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री दत्ता भरणेही उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त  असंख्य शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, “मी आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो. तेव्हा एक कार्यकर्ता मला वळूनवळून सांगत होता दादांना सांभाळा. त्यावर मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा आपण एवढी वर्षे मधली आपण उगाच घालवली. उगाचच इतकी वर्षे वेगळे राहिलो. आधीच एकत्र यायला हवे होते. आता जे एकत्र आलो आहोत ते चांगल्या आणि विधायक कामांसाठी एकत्र आलो आहोत. आता जे चांगले आहे ते करुन दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंच्या साक्षीने घेतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे हे भाषण करत होते त्याचवेळी जमलेल्या गर्दीपैकी एकजण ओरडून म्हणाला ते शिवस्मारकाचे लवकर बघा. त्यावरही उद्धव ठाकरेंनी हसून दाद दिली आणि म्हणाले “होय सगळे बघतो. आज लोकांचे सरकार आलेले आहे. त्यामुळे काळजी करु नका. शिवनेरी आणखी कशी सजावयची याकडे आम्ही लक्ष देतो आहोत. हे आपले वैभव आहे”असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

Related posts

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी

rasika shinde

संभाजी भिडे यांचे मुंबईतील व्याख्यान रद्द करण्याची भीम आर्मीची मागणी

News Desk

मित्रपक्षावर अवलंबून न राहता स्वबळावर उमेदवार निवडून आणणारा !

News Desk