HW News Marathi
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार झाले कोरोनामुक्त

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. २६ ऑक्टोबरला अजित पवारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता ते बरे होऊन घरी जात आहेत. पुढचे काही दिवस ते घरी विश्रांती घेणार असल्याची माहितीही सुप्रिया सुळे यांनी दिली आहे,

कोरोनाच्या काळात अजित पवार सतत दौऱ्यांवर होते. विविध ठिकाणी भेटी, मंत्रालयातील बैठका तसेच अतिवृष्टीच्या काळात फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी ते दौरे करत होते. याच दरम्यान त्यांना काहीसा थकवा जाणवत होता. त्यामुळे ते चार-पाच दिवस होम क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर कोरोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते.

खबरादारीचा उपाय म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आता उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. त्यामुळे काही वेळ पुन्हा घरी विश्रांती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा कामावर रुजू होतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत! – धनंजय मुंडे

Aprna

थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का…!, भाजपने पुन्हा साधला निशाणा

News Desk

आजच्या हिवाळी अधिवेशनात ६ अध्यादेश, १० विधेयके मांडणार

News Desk