HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांचं ठरलं आहे की १२ नावं बाजूला काढून ठेवायची, हसन मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट

मुंबई | विधानपरिषदेवर कोणाची नावे जाणार यावरुन चर्चा सुरु आहे. दरम्यान, या नावावरून आता ग्रमाविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी १२ नावं बाजूला काढून ठेवायची असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. माझं, आणि देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं झालं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झाली आहे. ही यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हटल्याचे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

विधान परिषदेच्या जागेवरून अनेक नावे पुढे येत आहे. मात्र राज्यपाल हे तेथील खुर्चीत बसून भाजपाची भूमिका मांडत आहे. यावरून सोशल मीडियावरून चर्चा रंगली आहे. त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील थेट पत्रकाराच्या प्रश्नावर म्हणाले की तुम्हाला उमेदवारी देऊ का अशी थेट ऑफर दिली. तर त्याबाबत राज्यपालांनाच विचारा मी त्यावर बोलणार नाही. राज्यपालपदाची गरिमा राखली गेली पाहिजे, अशी चर्चा करणारे ती राखत नाही.मात्र राज्यपालबाबत असे मी असे बोलणार नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार, वारसा घेऊन आमची वाटचाल! –  मुख्यमंत्री

Aprna

लोकप्रियतेसाठी, टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणाऱ्यातला मी नाही – मुख्यमंत्री

News Desk

सोनिया गांधींनी ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी! – बाळासाहेब थोरात

Aprna