HW News Marathi
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्र्यांची सोशल डिस्टन्स राखत काम करण्याची अनोखी पद्धत !

मुंबई | संपूर्ण जगात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामूळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही अंशी सुरळीत होत असले तरी चित्ता मात्र कायम आहे. कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर सोशल डिस्टन्सचे पालन करणे अत्यंत गरजेचा आहे असे आरोग्य मंत्रालयाकडून तर सांगण्यात आले आहेच. सरकारही वारंवार या बाबी पाळण्यास सांगत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलीच काळजी घेत असल्याचे दिसत आहे. त्यांचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात आपल्या कार्यालयात खास व्यवस्था करत सोशल डिस्टन्सिंगचे पालन केलेले दिसत आहे.

अजित पवार ज्या ठिकाणी बसले आहेत तेथून एका रिबीनने चौैकोन आखला आहे. आणि या चौकोनाच्या आत बसून ते कामकाज करताना दिसत आहेत. दरम्या, या फोटोमध्ये समोर खासदार सुप्रिया सुळे लावणी कलावंत महासंघाच्या काही मागण्या घेऊन अजित पवारांच्या भेटीला आल्या आहेत. मात्र, असे सोशल डिस्टन्सचे पालन करत अजित पवार काम करताना दिसत आहेत आणि लोकांना देखील अशीच आपली काळजी घेण्यासाठी एक उदाहरण समोर ठेवत आहेत.

दरम्यान, आता जरी उपमुख्यमंत्री अजित पवार सोशल डिस्टन्सचे पालन करताना दिसत असले. तरी, याच सोशल डिस्टन्सवरुन ते पुण्याच्या दौऱ्यात चर्चेच्या विषय ठरले होते. मनसे कार्यकर्त्याला त्यांनी अगदी जवळ का येताय लांबून बोला असे म्हणत फटकारले होते. त्यावरुन अजित पवारांवर विरोधकांनी टिका केल्या होत्या. मात्र, आता इथे त्यांचे हे सोशल डिस्टन्स लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही!

News Desk

मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीला‘जय महाराष्ट्र’ केला! विखे पाटील

News Desk

आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात सरकारला धारेवर धरू ! चंद्रकांत पाटलांची ग्वाही

News Desk