HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं – अजित पवार

मुंबई | मुंबई महापालिका निवडणुक तोंडावर आली असताना सर्व पक्ष मोर्चेबांधणी करण्यात रमले आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेनेदेखील बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली आहे. यामुळे महाविकास आघाडी मुंबई महापालिका एकत्रित लढणार की स्वबळावर अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते मुंबईत आज (७ जानेवारी) पत्रकारांशी बोलत होते.

“राष्ट्रवादीची सध्या तरी मित्रपक्षांसोबत आघाडी करुन पुढं जायचं अशी चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना आहे. शरद पवार, जयंत पाटील सर्वांना चर्चा करुन निर्णय घेतली. पण आमची मानसिकता आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये अशीच आहे. मतांची विभागणी होईन ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला असं होऊ शकतं. मी तरी याबाबतीत सकारात्मक आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे. मुंबई महापालिकेसाठी शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं समीकरण जुळू शकतं का ? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं आहे. आम्ही बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासोबत चर्चा करु. महाविकास आघाडीला अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न असेल”.

नामांतराच्या मुद्द्यावर काय म्हणाले?

“महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे आली. गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरु आहे. नामांतराच्या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू,” असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. प्रकाश आंबेडकरांनी पुण्याचं नाव बदलण्याची मागणी केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणी काय मागणी करावं हा ज्याच्या त्याचा आधिकार आहे. कोणी भावनिक मुद्दे काढतं, कोणी विकासाबद्दल बोलतं, कोणी नामकरणाबद्दल बोलतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या इतिहासात घडल्या आहेत. अशा काळात एका शहराचा मुद्दा आला तर दुसऱ्या शहरांचाही उल्लेख होते. आपल्या वक्तव्याच्या बातम्या झाल्या की मग इतरांनाही सुचू लागतं. मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. हे आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडी टीकावी आणि विकासाला महत्व द्यावं ही शरद पवारांची भूमिका असून आम्हीदेखील त्याचं समर्थन करुन पुढे जात आहोत”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणूनच देशातील जुनी वाहने भंगारात काढणे गरजेचं असल्याची नितीन गडकरींची माहिती! 

News Desk

१ ऑगस्टपासून ठाणेकरांना मिळणार ५० एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ

Aprna

“हा अंतर्गत धोका असावा”, आशिष शेलारांचा टोमणा

News Desk