HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात सत्तांतरानंतर ‘गोकुळ’ला अच्छे दिन, नवी मुंबईत दिली जागा, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

कोल्हापूर | कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघासाठी महत्त्वाची बतमिर आहे. गोकुळ दूध संघाला आता नवी मुंबईत जागा मिळणार आहे. मार्केटिंग आणि दूध विक्रीसाठी सिडकोची ५ एकर जागा गोकुळ दूध संघाला देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. सत्तांतरानंतर गोकुळ दूध संघाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने अजित पवारांची भेट घेतली, त्यावेळी यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.

काय आहेत अजित पवारांचे आदेश?

गोकुळ दुधाच्या मार्केटिंग आणि दूध विक्रीसाठी नवी मुंबईत वाशी येथे जागा निश्चित करण्याचे आदेश अजित पवार यांनी सिडकोला दिले आहेत. त्यानुसार सिडकोची ५ एकर जागा गोकुळ दूध संघाला मिळणार आहे. सत्तांतरानंतर गोकुळ संचालक मंडळाने घेतलेल्या भेटीवेळी अजित पवार यांनी जागेसंदर्भात घोषणा केली. नव्या जागेमुळे मुंबईतही गोकुळचे प्रस्थ वाढणार आहे. संचालक मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे दिग्गज नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचीही यावळी भेट घेतली आहे.

गोकुळ निवडणूकीत सतेज पाटलांचा दणदणीत विजय

नुकत्याच झालेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत अखेर सत्तांतर झालं. गोकुळ दूध संघावर सतेज पाटील-हसन मुश्रीफ यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने विजय मिळवला. गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक आणि आमदार पी एन पाटील गटाच्या तब्बल तीन दशकांच्या सत्तेला सतेज पाटील गटाने शेवटी सुरुंग लावला आहे. गोकुळ दूध संघाच्या 21 पैकी 17 जागा या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या आघाडीला मिळाल्या होत्या. सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं.

दूध उत्पादकांना २ रुपयांची केली दरवाढ

गोळुळ दूध संघाची निवडणूक जिकंल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी “दूध उत्पादकांनी चांगलं यश दिलं. मनापासून दूध उत्पादकांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोण्याच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपली, आता आमचा नवा अजेंडा असणार आहे. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार आहोत. शेतकऱ्यांना २ रूपये दर वाढवून देणार आहोत. आमच्या शब्दात आम्ही मागे पडणार नाही. दूध गोकूळ संघात प्रस्थापित व्यवस्था आहे. त्यातल्या उणिवा दूर करायच्या आहेत. आम्हाला थोडा वेळ द्या,” असे निवडणूक जिंकल्यानंतर सतेज पाटील म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जिथे पूर परिस्थिती होती तिथे अजूनही कोरोनाचं संकट घोंगावतये” – उद्धव ठाकरे

News Desk

कुर्ला पूर्व द्रुतगती मार्गावर तणाव, नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक

News Desk

‘खाल्ल्या मिठाला जागावे’, सुप्रिया सुळेंचा सुजय विखे-पाटलांना टोला

Aprna