HW News Marathi
Covid-19

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढव, अजित पवारांचे आदेश

कोल्हापूर | आज (१४ जून) उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोरोना स्थिती कोल्हापूरमधील कशी आहे याचा आढावा घेण्यासाठी ते गेले आहेत. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने पटीने वाढवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिल्या आहेत. कोरोना नियंत्रणासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर बोलत होते. तसेच पवार यांनी यावेळी आपल्या जिल्ह्यातील कोरोनाची ही स्थिती कमी करण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूरच्या जनतेला केलं. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील उपस्थित होते.

यावेळी अजित पवार यांनी जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रेट वाढला तरी काही हरकत नाही पण टेस्ट दोन पटीने वाढवा अशा सुचना जिल्हा प्रशासनाला केल्या. तसेच, यावेळी त्यांनी नागरिक हे पोलिसांना पाहून मास्क घालतात असे म्हणत नाराजी व्यक्त करत गरज पडल्यास आणखीन कडक निर्बंध करणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी सध्या कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल करणार नाही, असे पवार यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी त्यांनी जिल्हाप्रशासनाला किंवा शासनाला काणालाही त्रास द्यायचा आमचा हेतू नाही. खासगी रूग्णालयांनी उपचार करताना आवाजावी बिल घेऊ नये असे म्हटले आहे.

तसेच, अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गृहविलगीकरण कमी करून संस्थात्मक विलगीकरण वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकडे गांभीर्यांने पाहत लहान मुलांसाठी टास्क फोर्सटी स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. तसेच सध्या ऑक्सिजन आणि फायर ऑडिवर बराच खर्च होत असल्याचेही त्यांनी म्हटले. तर सिपीआरच्या फायर ऑडिटचा होणार खर्च हा राज्य शासन उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, आज सकाळी कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे सुद्धा उपस्थितीत होते. या भेटीमुळे कोल्हापूरमध्ये चर्चेंना उधाण आले आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहे. आज सकाळी अचानक अजित पवार यांचा ताफा न्यू पॅलेसकडे वळला. अजित पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती. यावेळी मराठा संघटनेचे काही नेते सुद्धा उपस्थितीत होते, अशी माहिती समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असंघटीत क्षेत्रातील कामगारांना पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता द्यावा

News Desk

कोरोनावर मात केल्यानंतर राजीव सातव यांची प्रकृती खालावली, न्युमोनियाचा झाला संसर्ग

News Desk

राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk