HW News Marathi
महाराष्ट्र

“रायगडावर लायटिंग केली, हे उत्साही लोकांमुळे घडतंय”, रायगडावर केलेल्या लायटिंगवरुन उपमुख्यमंत्र्यांचीही नाराजी

रायगड | शिवजयंतीनिमित्त रायगडवर करण्यात आलेल्या डिस्को लाईटवरुन वादाला तोंड फुटलं आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आधीच उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नापसंती दर्शवली. “रायगडावर लायटिंग केली, हे उत्साही लोकांमुळे घडतंय. त्यांचा अजाणतेपणा दिसून येतोय. पण महाराजांचा वारसा आहे, तिथं असं घडण चुकीचं आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व खात्याकडून परवानगी घेऊन स्वत:च्या निधीतून रोषणाई केली. शिवजयंतीच्या पूर्व संध्येला किल्यावरील अनेक भाग रात्रीच्या अंधारात उजळून निघाले. मात्र आता यावरुन वाद उफाळला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करत असतात. यात काहीवेळा अजाणतेपणी म्हणा किंवा फार उत्साहामध्ये म्हणा अशा गोष्टी होतात. या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्यातलं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. महाराजांचे विचार लक्षात घेतले पाहिजेत. रायगडावर डीजे लाईट लावणं ही बाब अतिशय गंभीर आहे. पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाला यापुढे काळजी घ्यावी लागेल”, असं अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजभवनामधून भाजपचे कार्यालय सुरु”, नाना पटोलेंचा राज्यपालांवर गंभीर आरोप

News Desk

नांदेड महापालिकेत भ्रष्टाचार, प्रशांत पोपशेटवार यांचा आरोप

swarit

“संजय राठोड आमचे दुश्मन नाही आणि शिवसेना तर …”,चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

News Desk