HW News Marathi
Covid-19

“संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होणार” अजित पवारांचे बैठकीपूर्वी सूचक विधान!

बारामती | आज (१० एप्रिल) मुख्यमंत्री उद्दव ठाकरे राज्यातील कोरोना स्थितीवर सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता व्हिडिओ कॉंन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनविषयी काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्याचं लक्ष सतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय नसेल, राज्यासाठी एकच निर्णय घेतला जाईल असं अजित पवारांनी सांगितलं आहे. तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आज्या सर्वपक्षीय बैठकीत जो निर्णय घेतला जाईल तो सगळ्यांनी मान्य करावा, उगाच राजकीय फाटे फोडू नये अशी ताकीदच दिली आहे.

अजित पवार म्हणाले, “आज बैठक आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही. आज बारामतीत बैठक घेऊन इंजक्शन, बेड, लसीकरण, रुग्णवाहिका याचा आढावा घेतला. बारामतीत होत असलेली वाढ रोखण्यासाठी काही निर्बंध लादण्याबद्दल पोलिस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत”

राज्य शासनाच्या एकाही हॉस्पिटलमध्ये रेमडिसीव्हरचा इंजक्शन कमी पडत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्याबद्दलही चर्चा झाली. जिल्ह्यात याबद्दल कशा पद्धतीने उपाययोजना राबवायच्या याबद्दल पुण्यातील बैठकीत निर्णय घेणार आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.तसेच, आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या उद्यापासून दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करुन त्याबद्दल आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्हालाही लोकांची काळजी आहे”, सर्वोच्च न्यायालयाला मोदी सरकारचे प्रत्युत्तर

News Desk

“पुण्यात लॉकडाऊन करा”, मुंबई उच्च न्यायालयाची उद्धव ठाकरेंना सूचना!

News Desk

शरद पवार, आरोग्यमंत्री आणि पालक मंत्र्यांसह सोलापूर दौऱ्यावर, परिस्थितीची करणार पाहणी

News Desk