HW News Marathi
महाराष्ट्र

कितीही संकट येवोत, महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही !

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आज (१० जून) २२ वा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त मुंबईत कार्क्रम आयोजित केला असून त्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. आपलं सरकार स्थिरस्थावर होत नाही तोच कोरोनाचं संकट आलं. मधल्या काळात राज्यात दोन वादळं येऊन गेली. या संकटाचा आघाडी सरकारने सामना केला, असं सांगतानाच कितीही संकट येवोत, आव्हान येवोत महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना अजित पवार बोलत होते. राज्यात आघाडीचं सरकार आल्यानंतर नैसर्गिक संकटं आली. या संकटाचा आपण सामना केला. यापुढेही आपल्याला आव्हानाचं रुपांतर संधीत करावं लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारने लोककल्याणाची कामं केली आहेत. ही कामे लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असं पवार म्हणाले आहेत.

संविधान वाचवण्याचं आव्हान

केंद्रात भाजपचं सरकार आहे. या सरकारने देशातील एकता आणि आखंडतेला धक्का देण्याचं काम सुरू केलं आहे. लोकशाही संस्था मोडीत काढण्याचं काम सुरू केलं आहे. पत्रकारांपासून अनेक घटकांची मुस्कटदाबी सुरू आहे. लोकशाहीला झुंडशाहीचं स्वरुप देण्याचं काम सुरू आहे. संविधान वाचवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. अशावेळी लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे, असं ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम

कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावरही त्याचा परिणा झाला आहे, असं ते म्हणाले. भाजपचं केंद्रात सरकार आल्यापासून देशात महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेलपासून ते स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडीने लोकांना प्रचंड मदत केली. बेड, औषधे, अन्यधान्य आणि इतर शक्य ती मदत देण्याचं काम आपण केलं आहे. कोरोनाचं संकट दूर होईपर्यंत आपल्याला ही मदत करावी लागणार आहे, असंही ते म्हणाले.

केंद्रात भाजपाचं सरकार आल्यापासून देशात एकता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांना धक्का देण्याचं काम सुरु आहे. लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु असून हे गंभीर आहे अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान, मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

“भाजपाच्या विचाराचं सरकार आल्यानंतर देशात एकता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांना धक्का देण्याचं काम सुरु आहे. लोकशाही टिकवून ठेवणाऱ्या संस्था मोडीत काढल्या जात आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेची अवस्था गंभीर आहे. सगळे पत्रकार एकाच सुरात, भाषेत कसं ट्वीट करतात हे पाहिल्यामतर लोकशाही संकटात असलेली भीती निर्माण होते,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याच प्रयत्न सुरु असून हे गंभीर आहे. लोकशाही आणि राज्यघटना टिकवण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. राष्ट्रवादी अशा लोकशाहीविरोधी विचारांविरोधात शक्तीविरोधात ठामपणे उभी राहील,” असा विश्वास अजित पवार यांनी यावेली व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या होणारा दसरा मेळावा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा – पंकजा मुंडे

News Desk

महाभकास आघाडी सरकारमुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती

News Desk

डेक्कन क्विन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ

News Desk