HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांच्यावर केलेल्या आरोपावर अजित पवार म्हणाले…

पुणे | नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत, असं पुन्हा एकदा ठणकावून सांगताना लसीकरण, कोरोना याविषयी काम करणं गरजेचं असल्याचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. आज (८ जानेवारी) ते पुण्यात बोलत होते. औरंगाबाद नामांतरावरुन राज्यातलं राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालं आहे. नामांतर झालंच पाहिजे, अशी भूमिका सेनेने घेतली आहे, तर काँग्रेसने नामांतराला कडाडून विरोध केलाय. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेत नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल, असं म्हटलं आहे.

राज्यात नामांतराशिवाय कोरोना, लसीकरण यावर काम होणं गरजेचं

राज्यात औरंगाबादच्या नामांतरावरुन चांगलाच गोंधळ सुरू आहे. यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. नामांतराचा मुद्दा हा महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल. याव्यतिरिक्त राज्यात अनेक प्रश्न आहेत. लसीकरण, कोरोना याविषयी काम करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. नामांतराचा मुद्दा तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून सोडवतील, असं म्हणत नामांतरावर त्यांनी शिष्टाईची भूमिका दाखवली आहे.

राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीत इनकमिंग, पुढेही होत राहतील

राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होत आहेत. मात्र पुढचे काहीच पक्षप्रवेश होताना प्रवक्ते हे माध्यमाला सांगतील. त्यामुळे तो काही मोठा प्रश्न नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे पुढच्या काळात पक्षप्रवेश होतील, असं सूचकपणे अजित पवार यांनी सांगितलं आहे.

मेहबुब शेख यांच्यावरील आरोपात तथ्य नाही

राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावरती होत असलेल्या आरोपाचं अजित पवारांनी खंडन केलं. मेहबूबवर झालेल्या आरोपात कोणतंही तथ्य नाही. पोलीस तपासात योग्य माहिती समोर येईल. आम्ही कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत नाहीत. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी-भाजपच्या ‘या’ दोन उमेदवारांची मालमत्ता 100 कोटीच्या घरात

Aprna

“दिवाळीनंतर गोड बातमी देण्याची उर्जामंत्र्यांची घोषणा हवेत विरली”, राजू शेट्टींचा टोला 

News Desk

पंढरपूरच्या सभेत जयंत पाटलांचं भर पावसात भाषण! साताऱ्याची पुनरावृत्ती होणार?

News Desk