HW News Marathi
महाराष्ट्र

MPSCExam : विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ नाही आली पाहिजे, अजित पवारांनी व्यक्त केली खंत

पुणे | एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे राज्यात प्रचंड गदारोळ माजला होता. विद्यार्थी आक्रमक होत रस्त्यावर आले होते. दरम्यान, या परीक्षेची नवी तारीख जाहिर झाली आहे. २१ मार्चला ही परीक्षा होणार आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना विद्यार्थांना रस्त्यावर यायची वेळ आली म्हणुन खंत व्यक्त केली आहे.

एमपीएससी परीक्षेच्या गोंधळावर बोलताना ते म्हणाले की, “यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही. एमपीएससी स्वायत्त संस्था आहे. त्याच्यात काहींनी राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला. आमचा एमपीएससीच्या मुलांना पाठिंबा आहे मात्र सरकार काहीतरी वेगळं करतंय असं भासवण्याचा प्रयत्न झाला. त्यासंदर्भात मी दुपारीच मुख्यमंत्र्यांशी बोललो. यावेळी त्यांनी आपण स्वत: यामध्ये लक्ष घातल्याचं सांगितलं. त्यांनी एमपीएससीला सांगून विद्यार्थ्यांच्या बाबतीत वातावरण अशा पद्दतीने खराब करणं योग्य नसल्याचं सांगितलं”.

जर पूर्वनियोजित सगळं ठरलं होतं तर विद्यार्थ्यांवर अशी वेळ का आली असं विचारण्यात आलं असता अजित पवार म्हणाले की, “मी अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही, झालो की याचं उत्तर देईन…मी पहिल्यांदाच सांगितलं की एमपीएससीने हे सर्व करत असताना व्यवस्थितपणे प्रकरण हाताळायला हवं होतं. एमपीएससी प्रकरण हाताळण्यात कमी पडलं हे माझं स्पष्ट वैयक्तिक मत आहे”.

“राज्याचे प्रमुख बोलले आहेत. आम्ही प्रमुखांच्या हाताखाली काम करत आहोत. उद्धव ठाकरेंनी निर्णय दिल्यानंतर त्याची अमलबजावणी करण्याचं काम सरकारकडून केलं जाईल आणि आमचा पाठिंबा राहील,” असं अजित पवारांनी सांगितलं. “झालं ती दुर्दैवी घटना म्हटलं पाहिजे. विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ नाही आली पाहिजे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ता ही विनयाने वापरायची असते !

News Desk

ब्लू व्हेल गेमवर केंद्राला विचारून बंद करणार

News Desk

मुख्यमंत्र्यांसोबत कोणत्या विषयांवर चर्चा झाली?, खुद्द पवारांनीच दिलं उत्तर

News Desk