HW News Marathi
महाराष्ट्र

PandharpurElection : पंढरपुरात पहिल्या फेरीत भाजपला ४५० मतांची आघाडी तर राष्ट्रवादीची पिछाडी

पंढरपूर | पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजता पंढरपूर येथील शासकीय गोदामात सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यात ही लढाई सुरु आहे. या निवडणूकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर, तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पिछाडीवर आहेत. पहिल्या फेरीत भाजपला ४५० मतांची आघाडी मिळाली होती. भाजपचे समाधान आवताडे यांना २८४४ तर राष्ट्रवादी भगीरथ भालके यांना २४९४ मतं मिळाली आहेत.

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर असून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणात? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंदिर पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकार नियमावली तयार करणार – प्रकाश आंबेडकर

News Desk

मी दिल्लीत गेलो त्याचा आणि राजीनाम्याचा काही संबंध नाही – बाळासाहेब थोरात 

News Desk

पूर परिस्थिती असताना, तुम्ही निवडणुकांचा विचार तरी कसा करून शकता !

News Desk