HW News Marathi
महाराष्ट्र

पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात बैठक संपन्न, सकारात्मक चर्चा झाल्याची सर्वच नेत्यांची माहिती

मुंबई | पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात आज (१ जून) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय उपसमितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सर्वच नेत्यांनी दिली. या बैठकीला महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, केसी पाडवी उपस्थित होते. पदोन्नतमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु सरकारमधील प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसचा या निर्णयाला विरोध आहे.

लवकरच तोडगा निघेल – नितीन राऊत

पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली. याबाबत लवकरच तोडगा निघेल, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. कोर्टाच्या प्रलंबित याचिकेमुळे पेच निर्माण झाला आहे. त्यावर सखोल कायदेशीर अभ्यास केला जाईल, अशी माहिती ऊर्जा राऊत नितीन राऊत यांनी दिली. माझी नाराजी नव्हती. आम्ही हा विषय लावून धरला आहे. तीन पक्षाच सरकार आहे त्यामुळे तीनही पक्षाच्या नेत्याना एकत्रित विचार करावा लागेल, असंही राऊत यांनी सांगितलं.

पदोन्नतीमधील आरक्षण विषयावर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करुन दिली आहे.या बैठकीत पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा झाली. येत्या काळात त्यावर निर्णय होईल, अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा सरकारचा निर्णय

राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. हे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात राज्य शासनाने 7 मे रोजी GR काढला होता. त्यानुसार राज्यसेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती सेवाज्येष्ठतेनुसार करुन कोट्यातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयानंतर राज्यातील महाविकास आघाडीवर टीका होऊ लागली होती. शिवाय काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी, म्हणाले….’

News Desk

‘मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं’, संजय राऊतांचा विरोधकांवर संताप

News Desk

‘ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच’ विरोधी पक्षाची टीका

Ruchita Chowdhary