HW News Marathi
Covid-19

कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका – अजित पवार

रायगड | कोरोना पाठोपाठ राज्यावर लॉकडाऊनचं संकट गडद होताना दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आल्यानं लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, पुढील ८ दिवसांत रुग्णसंख्या आणि करोना वाढला तर लॉकडाउनचा निर्णय घेण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राला कळकळीचं आवाहन केलं आहे.

न्हावा शेवा टप्पा-३ योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (२२ फेब्रुवारी) झाले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, “राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला लागला आहे. दररोज रुग्णांची वाढतेय. सावध राहायला हवं. मास्क वापरायला हवा. शहरात लॉकडाऊनची वेळ येणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागले. पुण्यातही थोडी कडक भूमिका घ्यावी लागली. प्रशासन व राजकीय प्रतिनिधींशी चर्चा करून रात्रीच्या वेळी कडक भूमिका घेण्यात आली आहे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.

“आताच कोरोना तर पूर्ण कुटुंबालाच वेढून टाकतोय. मी हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलत होतो. आमचे काही सहकारी अनिल देशमुख, जयंत पाटील, सतेज पाटील, छगन भुजबळ, डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह अनेक मंत्र्यांना करोना झाला आहे. संख्या वाढत चालली आहे. एकदा लॉकडाउन केल्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी विस्कटून जातेय, हे आपण पाहिलं आहे. दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटते, त्यांची तर एवढी बिकट अवस्था होतेय. कसं जगायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो. लोकांचं करोनाबद्दलचं गांभीर्य निघून गेलंय. कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका, हेच मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे,” असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

“मास्क वापरा, कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दरडावलं. ते रायगडमध्ये बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजना भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. कोरोना वाढत आहे, पण विकासकामंही सुरु आहेत. केंद्राकडून जीएसटीचे पैसे येणे बाकी आहेत, मात्र पायाभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड अर्थात कॉम्प्रमाईज करत नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.

“१ फेब्रुवारी पासून कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे कार्यक्रम हे साधेपणाने घ्यावे लागत आहेत. राज्यात कोरोनाचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनामुळे सर्व कार्यक्रम साधेपणाने साजरे करा, प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन पुढे जायचं आहे. सर्व विकासकामं जोरात सुरु आहेत, पाणी हे जीवन आहे, त्याचा योग्य वापर करा, पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन हा प्रकल्प सुरु केला”

आजचा हा कार्यक्रम रायगडसाठी महत्वचा आहे. ४०० कोटीपेक्षा जास्त खर्च नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजनेसाठी केला जातोय. शहरीकरण, औद्योगीकरण वाढतंय. त्यामुळं त्यासाठी पाणी पुरवठा सुद्धा वाढवावा लागणार आहे. केंद्रकडून जीएसटीची मोठी रक्कम अजून येणं बाकीच आहे. पायाभूत सेवेसाठी आम्ही कुठेही तडजोड अर्थात कॉम्प्रमाईज करत नाही. कोस्टल रोड, मेट्रो, बोगदे, गोवा- मुंबई हायवे त्यांचं काम सुरू आहे. राजकारण न आणता कोकणचा कायापालट व्हावा, असं अजित पवार यांनी नमूद केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : देशात गेल्या २४ तासात ३६०४ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk

लग्न समारंभ व अंत्यसंस्कारमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे । आरोग्य मंत्रालय

News Desk

अमित शहांच्या कोरोना रिपोर्टबद्दल संभ्रम !, गृहमंत्रालयाने फेटाळले वृत्त

News Desk