HW News Marathi
महाराष्ट्र

जिल्हा सहकारी बँकांमध्ये केंद्राचा हस्तक्षेप, अजित पवार म्हणाले याविरोधात न्यायालयात जाणार!

मुंबई। जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थांमध्ये केंद्र सरकारने अनेक बदल केले आहेत. केंद्राकडून जिल्हा बँकां चालवण्याचा अधिकार केंद्राने काढला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकराच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचाही इशारा अजित पवार यांनी दिला आहे. केंद्र सरकारने सहकार खात्याची निर्मिती केली असून आता सहकार क्षेत्रात केंद्राकडून हस्तक्षेप करण्याचा प्रकार सुरु झाला असल्याचे दिसतं आहे. जिल्हा बँका चालवण्याचा अधिका केंद्राने काढून घेतला असून अध्यक्ष आणि संचालक निवडीमध्येही केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याचेही अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं आहे.

अध्यक्ष आणि संचालक बदलीमध्ये केंद्राचा हस्तक्षेप

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी सहकारी बँकांच्या क्षेत्रात केंद्राचा हस्तक्षेप वाढल्याने बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या असल्याचे म्हटलं आहे. अजित पवार म्हणाले की, काही नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारने नवीन बदल केले आहेत त्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. यामध्ये जवळपास जिल्हा बँक चालवण्याचे अधिकार काढून घेतले आहेत. अध्यक्ष आणि संचालक बदलीमध्ये केंद्राचा हस्तक्षेप वास्तविक सगळ्यांनी मिळून बँक चालवण्याचा प्रयत्न केला आहे.

सहकार विभागाकडून न्यायालयात जाणार

महाराष्ट्रातील पहिल्या पाचामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे. तरी देखील सहकार बँकामधले अधिकार स्वतःच्या ताब्यात घ्यावा असा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात वकिलांचा सल्ला घेऊन काही सरकारच्या वतीने सहकार विभागाकडून न्यायालयात जाणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने केलेल्या बदलांमुळे नवीन प्रश्न निर्माण झाले असल्यामुळे कोर्टात जाणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

दिवाळीपुर्वी सगळी काम पुर्ण करा लागेल तिथं सरकार सहकार्य करेल

उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यकुशल आहेत. वेळेच्या आणि कामाच्या बाबतीत अजित पवार शिस्तबद्ध आहेत. यामुळे अधिकाऱ्यांच्या कामावर अजित पवार यांनी बारामती दौऱ्यादरम्यान संताप व्यक्त केला आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतलं आहे. “तुम्ही काय कारणं सागता, तुम्ही काही जण माझ्या गतीने काम करा म्हणजे कामं होतील’ असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. मला कोणतेही कारण सांगू नका, दिवाळीपुर्वी सगळी काम पुर्ण करा लागेल तिथं सरकार सहकार्य करेल असं अजित पवारांनी अधिकाऱ्यांना म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील नेत्यांमुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल – सामना

News Desk

महापौर किशोरी पेडणेकर यांनी अनेक फ्लॅट बळकावल्याचा आरोप, हायकोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

News Desk

भाजपचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून- अशोक चव्हाणांना विश्वास

News Desk