पुणे | देशात, राज्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असली तरी दुसरीकडे कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सामान्य लोकांपासून ते नेत्यांपर्यंत आता सगळ्यांनीच कोरोना लस घेण्यास सुरुवात केली आहे. ज्या नेत्यांनी कोरोनाची लस घेतली आहे त्यांनी लस घेतानाचे आपले फोटो शेअर केले आहेत. या वरुनच अजित पवारांनी टोला लगावला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२६ मार्च) पुण्यात लॉकडाऊनबाबत बैठक घेतली.
पत्रकार परिषदेत अजित पवारांनी पुण्यात सध्या तरी लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगितले आहे. पण कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर कडक निर्बंध लावण्याची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली. दरम्यान, अजित पवार यांना तुम्ही कोरोनाची लस घेतली का असा सवाल उपस्थित केला, यावर अजित पवारांनी आपल्या रांगडेबाज शैलीत पत्रकारांना जे उत्तर दिले त्यावरुन सभागृहात एकच हशा पिकला होता.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, मी कोरोनाची लस घेतली आहे. मात्र आपण फोटो काढलेला नाही. पत्रकारांनी लस घेतली का असा प्रश्न अजित पवारांना विचारल्यानंतर ते म्हणाले होय रे बाबा मी लस घेतली आहे. मला इतरां सारखी लस घेतांना फोटो काढायचा नव्हता आणि अशी नौटंकी आवडत नाही. असे म्हणत अजित पवार यांनी आपल्या खुमासदार शैलीचे पुन्हा एकदा दर्शन दिले. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बऱ्याच मंत्र्यांनी कोरोनाची लस घेत आपले फोटो शेअर केले आहेत.
राज्यात कोणी कोणी कोरोना लस घेतली?
- मुख्यमंत्री उद्दव ठाकरे
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
- राष्ट्र्वादीच्या खासदार सुप्रिया सुळे
- आरोग्य मंत्री राजेश टोपे
- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
- केंद्रीय मंत्री रामदास आठवले
- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.