HW News Marathi
Covid-19

“…मग कोरोना लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का?”

मुंबई । राज्यातील कोरोनास्थिती मोठी आव्हानात्मक आहे. सातत्याने वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा आणि आरोग्य यंत्रणेवरचा प्रचंड ताण यामुळे स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर, कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिलेल्या एका आदेशामुळे भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सुनील रामानंद म्हणतात की, “राज्यातील तुरंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली असल्याने कोरोना स्थिती लक्षात घेता यापुढे अत्यावश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे.” यावर निशाणा साधतात आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे की, “कोरोना लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का?”
आशिष शेलार याबाबत केलेल्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “कोरोनामुळे राज्यातील जेलमध्ये कैद्यांची व्यवस्था लावणे अवघड झाल्याने महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ( कारगृह) यांनी डीजीपींना पत्र लिहून विनंती केली आहे की, छोट्या गुन्ह्यातील नवीन आरोपी अटक करणे थांबवा! तिन्ही घटना गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत.” असंही शेलार यांनी सांगितलं आहे.
आशिष शेलार याबाबत पुढे लिहितात की “अर्जुन सकपाळ या तरुणाने बोगस IAS प्रमाणपत्र मिळवून रत्नागिरीत जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याचा बनाव रचला. बनावट अहवाल तयार करुन भांडूपच्या ड्रीम माँलमध्ये सनराइज हाँस्पिटलला अग्निशमन दलाची परवानगी घेतली गेली. कोरोनाच्या लढाईत अशा किती गोष्टी बोगस करुन सामान्य माणसे फसवली जाणार आहेत? कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? प्रशासन, कायदा सुव्यवस्था, राज्याचा शासकीय कारभार अशा प्रकारे ठाकरे सरकार संपूर्णत: गाठोड्यात बांधून ठेवणार आहे की काय?”, असे संतप्त सवाल आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केले आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आता सात दिवसांचा ‘होम क्वारंटाईन’

Aprna

अजित पवार यांनी भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करून सर्वांना दिल्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

News Desk

देशात १९९३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk