HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांनी उलगडलं सकाळी काम करण्याच्या स्टाईलचे रहस्य…!

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी पहाटे लवकर उठून पाहणी दौरा, बैठका आणि इतर राजकीय कार्यक्रम घेत असतात. त्यांच्या कामाची ही अनोखी स्टाईल आपण सगळ्यांनीच पाहीली आहे. यामागचे कारण अजित पवारांनी सांगितले आहे. यामागचं कारण सांगत हे गुण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून घेतले असल्याचं आवर्जून सांगितलं आहे. सकाळी लवकर उठण्याची सवय आमच्या चुलत्यांची (शरद पवार) आहे. ते २७ वर्षाचे असताना सकाळी ७ला कामाला लागायचे. आज त्यांचं वय ८० वर्ष पूर्ण असून सकाळपासून काम करत असतात असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

अजित पवार म्हणाले की, सकाळी लवकर उठण्याची सवय आजोबांची नाही तर चुलत्याची लागली आहे. आम्ही जस बघतोय तस चुलते 27 वर्षाचे असताना सकाळी सातला कामाला लागायचे. रात्री दोनला आले तरी सकाळी सात ला काम सुरूच. आता वय वर्ष ८० पूर्ण झालं. तरी देखील आजही सकाळ पासून कस साहेब काम करत असतात, हे आपण पाहतो. शेवटी तुमच्यावर कसे संस्कार होतात त्यावर अवलंबून असतं. सकाळी कामाला सुरुवात केली तर वातावरण देखील स्वछ असतं. एक, उत्साह असतो अस अजित पवार म्हणाले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनोख्या पद्धतीने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत पेट्रोल सोडणाऱ्यांनो तुम्ही नाउमेद होऊ नका. धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर काम केलय. नंतर, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. आपल्याला सर्वात श्रीमंत नाही व्हायचं. पण, पुढं आपलं बर होईल अशा शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून अस म्हणत चांगलं काम करा असा सल्ला त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या सकाळी उठूनच कामाला लागण्याच्या स्टाईलचे रहस्य आज सगळ्यांना समजले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धान उत्पादक शेतकऱ्यांचे शिल्लक ६०० कोटी तत्काळ वितरित करणार; अजित पवारांनी विधानसभेत दिली माहिती

Aprna

“किल्ले रायगडवरून कुणी आरोप केल्यास गाठ माझ्याशी”, संभाजीराजे झाले आक्रमक

News Desk

बीड ऍसिड हल्ल्याप्रकरणी धनंजय मुंडेंकडून पोलीस प्रशासनाला कठोर कार्यवाहीचे निर्देश

Gauri Tilekar