HW News Marathi
Covid-19

अजित पवार मुख्यमंत्र्यांना जरा सांगा ….निलेश राणेंनी काय मागणी केली ?

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या सध्या वेगाने वाढत आहे.याच पार्श्वभुमीवर राज्यात लॅाकडाऊन लावले जाणार अशी शक्यता बळावली आहे. राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत.मात्र ही रूग्णसंख्या वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लाॅकडाऊनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे नियोजनपद्धतीने हे लॅाकडाऊन १५ दिवसांसाठी लावले जाणार असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यातील उद्योग धंद्यांवर लॅाकडाऊनचा परिणाम होत असल्यानं भाजप नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना फटकराले आहे.

निलेश राणे यांनी ट्विट केले आहे की , अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही तर अर्थमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे की, लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही. कोरोना हाताळण्याची सिस्टम दर्जेदार करा पण नोकरी धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

२०२०मध्ये जो लॅाकडाऊन करण्यात आला होता त्याचा राज्यातील उद्योगांना मोठा फटका बसला होता. भारताची अर्थव्यवस्था नकारात्मक आकड्यात गेली होती. नुकतीच अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत असताना महाराष्ट्र पुन्हा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सामान्य उद्योजकांना याचा फटका पुन्हा बसणार आहे.

दरम्यान, राज्यात कोरोेना रूग्णसंख्या वाढत असताना रूग्णालयात बेड्स आणि आरोग्य सोई सुविधांची कमतरता भासत आहे. तर राज्यात संध्याकाळी 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी लावण्यात आली आहे. रूग्णसंख्या आटोक्यात न आल्यास राज्यात पुन्हा लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय सभा थांबवा, जमत नसेल तर आम्हाला सांगा ! कोर्टाने राज्य सरकारला सुनावलं

News Desk

चंद्रकांत पाटलांना मानसिक उपचारांची नितांत गरज ! अशोक चव्हाणांनी सुनावलं

News Desk

आज राज्यात १९ हजारांहून अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk