HW News Marathi
देश / विदेश

अजित पवार अर्थमंत्री होणार ?

मुंबई | महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर येत्या ३० डिसेंबरला होणार आहे. ३० तारखेला दुपारी विधानभवन परिसरात साधारण १२ ता २ च्या दरम्यान महाविकासआघाडीचे 36 नवे मंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त सापडत नव्हता. आता 30 तारखेला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार शपथ घेतील. यामध्ये अनेक दिग्गज तर काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव सर्वात आघाडीवर नाव आहे. गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता आहे, मात्र तुर्तास शिवसेना गृहमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अत्यंत निकटवर्तीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. सध्या अर्थमंत्री असलेले जयंत पाटील यांची जलसंपदामंत्रीपदी वर्णी लागु शकते. आणि अजित पवारांना अर्थमंत्री पद मिळू शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या विरोधात एकत्र येण्याची वेळ, ममता बॅनर्जींचं सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंना पत्रं

News Desk

मोदीजीने लिया है अपने उपर सभी मजदूरोंका भार इसलिए…आठवलेंची मोदींवर कविता!

News Desk

प्रफुल्ल पटेल पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

News Desk