HW News Marathi
महाराष्ट्र

भिलवडी पुरग्रस्त भागाला उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, बोटीतून केली पाहणी

भिलवडी | उपमुख्यमंत्री अजित पवार हे भिलवडी येते पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणीची पाहणी करत आहेत. भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आहे, पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व इतर मान्यवरया आहेत.

बाजारपेठेची पाहणी

भिलवडी येथील पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पुरग्रस्तांना ठेवण्यात आलेल्या निवारा केंद्राला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे ? याची त्यांच्याकडून माहिती घेतली. भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहेत.

कोल्हापूर दौरा रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज(२६ जुलै) कोल्हापूर दौऱ्याला जाणार होते. हेलिकॉप्टरनेच जाऊ अशी माहिती त्यांनी काल दिली होती, मात्र आज हवामान खराब असल्याने कोल्हापूरचा दौरा रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अजित पवार आज(२६ जुलै) सकाळी ९ वाजता कोल्हापूर विमानतळावर येणार होते. त्यानंतर सव्वा नऊन वाजता ते शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देणार होते. तिथून ते शिवाजी पूल पूरग्रस्त परिसराची पाहणी करणार होते. नंतर सव्वा दहा वाजता शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर जिल्ह्याती पूरग्रस्त परिस्थितीचा आढाव घेणार होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जवळपास १० महिन्यांंनंतर शाळेची घंटा वाजली, ५वी-८वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरण्यास आजपासून सुरुवात

News Desk

मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन प्लांट उभारावा, नागपूर खंडपीठाचे आदेश

News Desk

भाजप विधीमंडळ पक्ष नेत्याच्या निवडीसाठी बैठक

News Desk