HW News Marathi
Covid-19

“आम्ही जेव्हा लस घेऊ तेव्हा तुम्हाला सांगू”, अजित पवारांचे पत्रकारांना सडेतोड उत्तर

पुणे | संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच लसीकरणावरुन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारले की तुम्ही लस कधी घेणार यावेळी अजित पवार म्हणाले की, कोरोना लसीकरणााला अल्प प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोना लस दिली जात आहे. आम्हाला ज्या वेळेस लस घेण्याची परवानगी मिळेल, त्यावेळी घेऊ आणि तुम्हाला सांगू, असं अजित पवार म्हणाले.

“लसीबाबत काही अडचणी येत आहेत. एका सेंटरवर शंभर जणांना लस दिली जाते. तीन दिवसांच्या लसीकरण टप्प्यात केंद्राकडून प्रत्येकाला तारखांची माहिती येत होती. ग्रामीण भागात शंभर पैकी ६१ जणांनी लस घेतली. शहरी भागात सुरुवातीला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी मात्र तो कमी झाला. पिंपरी चिंचवडमध्ये तर २७ टक्केच लसीकरण झालं, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

कमी लसीकरणाबाबत अधिकाऱ्यांना विचारलं, तेव्हा काही कारणं समजली. संबंधित व्यक्ती आली आणि केंद्रावर आल्यावर म्हणाली की मला लस नाही घ्यायची. काही जणांना रात्री उशिरा कळवल्याने सकाळी येता आलं नाही. पण लस घेतलेल्या तीन-चार डॉक्टरांशी माझं बोलणं झालं. त्यांनी कुठलेही साईड इफेक्ट नसल्याचं सांगितलं. एका डॉक्टरला थोडासा ताप, कणकण जाणवत होती. मात्र तिसऱ्या दिवसापासून ते ठणठणीत झाले, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे. लसीकरणाचे अॅप राष्ट्रीय स्तरावरील आहे, त्यामुळे काही तांत्रिक अडथळे आहेत. कोणत्याही नवीन अॅपवर अडचणी येतातच, मात्र काही दिवसांनी सुरळीत होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस अशा व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. आम्हाला परवानगी मिळेल, त्या दिवशी घेऊ. अजून आम्ही डॉक्टर, नर्स, पोलीस यामध्ये मोडत नाही. ज्यावेळी आदेश येतील, की यांनीही लस घेतली पाहिजे, आम्ही लगेच लस घेऊन तुम्हाला सांगू की मी आज लस घेतली, असं अजित पवार म्हणाले आहेत. कोरोनावरील लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये नवीन इमारतीला काल (२१ जानेवारी) आग लागली होती. त्या पाहणीसाठी अजित पवार काल पुण्याला गेले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज

News Desk

कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही, सर्वांनी एकजुटीने ‘या’ संकटाचा सामना करण्याची वेळ !

News Desk

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊच नयेत; प्रक्रिया रद्द करून नव्याने निवडणुका घ्या

Aprna