HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी अजित पवारांच्या मर्जीतील विजय देशमुख यांची नियुक्ती !

पुणे। पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा अखेर सुटला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जाणाऱ्या विजय देशमुख यांना पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारी (२३ सप्टेंबर) रात्री उशिरा विजय देशमुख यांनी आपला पदभार स्वीकारला. विजय देशमुख यांना पुणे जिल्ह्यातील कामाचा अनुभव असून यापूर्वीही अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचे काम पाहिले आहे.

पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सिडकोतील ठाणे विभागाचे अतिरिक्त भूमी व भूमीपण अधिकारी अजिंक्य पडवळ, विजय देशमुख आणि पुण्याचे माजी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्या नावांची चर्चा होती. दरम्यान, विजय देशमुख हे अजित पवारांच्या मर्जीतील तर अजिंक्य पडवळ हे दिलीप वळसे पाटील यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जातात. त्यामुळे पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी नेमकी कोणाची नियुक्ती होणार याबाबत जोरदार चर्चा होती.

विजय देशमुख हे सध्या पुण्यात कुळकायदा शाखेत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तरकाही दिवसांपूर्वीच पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाच्या चर्चांना वेग आला होता.

f

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंदोलनाचा प्रतिसाद म्हणजे जनतेच्या मनात सरकारबद्दलचा असंतोष

swarit

संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, तर परबदेखील निशाण्यावर!

News Desk

ई – गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून देणार! – मुख्यमंत्री

Aprna