HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंच्या राष्ट्रवादीच्या येण्याच्या निर्णयावर अजित पवार नाराज ?

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम केला,ते उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील.यादरम्यान मात्र अजित पवार दिसेनासे झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याचे त्यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अजित पवारांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. अजित पवार हे कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त खबरदारी घेताना दिसले आहेत.कोरोना सृश्य लक्ष्मण जाणवल्याने अजित पवार यांनी सार्वाजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.

यानंतर आता अजित पवारांचा एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश उद्या (२३ ऑक्टोबर) होणार आहे आणि आज अजित पवार होम क्वारंटाईन झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. यात नेमकी काय तथ्य आहे यावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण येईल का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार पुणे, इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना थोडा थकवा जाणवत होता. तरीही त्यांनी शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. हा दौरा आटोपून परतल्यानंतर प्रकृती बिघडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामींना हायकोर्टाकडून दिलासा नाही,जामीन अर्ज फेटाळला!

News Desk

शिवसेनेत जुन्या शिवसैनिकांवर अन्याय केला जातोय म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव पुढे केले – नितेश राणे

News Desk

अमित शाहांच्या ‘देखते है’चा अर्थ मुख्यमंत्र्यांनी ‘हो’ घेतला –  चंद्रकांत पाटील

News Desk