HW Marathi
महाराष्ट्र

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा

मुंबई | अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जेष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठविण्यात आलेले ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण सुरक्षेच्या कारणास्तव आयोजकांकडून रद्द करण्यात आल्यानंतर मोठा वाद पेटला आहे. हा वाद सुरु असतानाच आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द करण्यात आल्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सहगल यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. “मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात मी देशातील असहिष्णुता, हिंसाचारावर बोलणार होते. आयोजकांकडे माझे हे भाषण देखील पोहोचले होते. परंतु, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देखील हजर राहणार असल्याची मला कल्पना नव्हती. कदाचित मुख्यमंत्री माझ्या भाषणाला घाबरले असतील. म्हणूनच, मला देण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण रद्द करण्यात आले असेल”, असा टोला ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांनी लगावला होता.

Related posts

Poladpur Bus Accident: आंबेनळी घाट दुर्घटनेत आतापर्यंत २७ मृतदेह बाहेर काढले

एसटी महामंडळाच्या तिकीटात १५ जूनपासून १८ टक्के वाढ

विजयादशमीला शस्त्रपूजन करणारच | संघ

Gauri Tilekar