HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमण्यात येणार

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये सर्व जातीचे पुजारी नेमण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. या निर्णयामुळे समाजात क्रांतिकारी बदल घडला जाणार आहे. यासाठी अंबाबाई मंदिराताली पगारी पुजारीपदासाठी आतापर्यंत ११३ अर्ज आले असून त्यापैकी सहा अर्ज हे महिला पुजाऱ्यांचे असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.

मंदिरात कामकाजासाठी ५५ पुजाऱ्यांची गरज असल्याची माहिती देखली महेश जाधव यांनी दिली आहे. या अर्जदार पुजाऱ्यांच्या मुलाखतींना मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. सर्व जातींचे पुजारी असावे आणि या पुजाऱ्यांना धार्मिक शिक्षण मिळावे, यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी वैदीक स्कूलची स्थापना केली होती. अंबाबाईच्या मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमले जात असल्याने कोल्हापूरकरांनी समाधान व्यक्त केले जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटील-अमित शहांची दिल्लीत भेट, बीएमसी निवडणुकीबाबत चर्चा – सूत्र

News Desk

पाझर तलाव फुटल्याने 30 हेक्टरवरील पिकासह जमिनीही गेल्या खरडून

Aprna

काँग्रेस आहे म्हणून महाराष्ट्रात सत्ता आहे! – अशोक चव्हाण

News Desk