मुंबई | लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मंजुरांना त्यांच्या घरी जाण्यास अभिनेता सोनू सूदने मदत केली. सोनू सूदच्या कामगिरीचे सर्व स्थरातून कौतुक होत असतानाच, शिवसेनेचे मुखपत्र सामनातून ‘लॉक डाऊन’ काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते?, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोनू सूदवर काल (७ जून ) टीका केली. काल राजकीय घडामोडी घडत असतानाच सोनू सदूने काल रात्री मातोश्रीवर जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
This evening @SonuSood met up with @CMOMaharashtra Uddhav Thackeray ji along with Minister @AslamShaikh_MLA ji and me. Better Together, Stronger Together to assist as many people through as many people. Good to have met a good soul to work for the people together. pic.twitter.com/NrSPJnoTQ6
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 7, 2020
काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासोबत सोनूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास पाऊण तास त्यांची चर्चा झाली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करुन भेटीसंदर्भात माहिती दिली. “सोनू सूद यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अस्लम शेख यांच्यासह भेट घेतली. अनेकांच्या साथीने अनेकांच्या मदतीसाठी एकत्र आलो आहोत. एका चांगल्या व्यक्तीला भेटलो” असे त्यांनी ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले.
अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला..
मातोश्रीवर पोहोचले
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) June 7, 2020
यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा सोनू सूदला टोला लगावला. राऊत म्हमाले, “अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला.. मातोश्रीवर पोहोचले जय महाराष्ट्र”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.