HW News Marathi
महाराष्ट्र

प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक 

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चांदोळे टॉप्स ग्रुपचे भागीदार असल्याची माहिती आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक केली आहे. ‘टॉप्स सिक्युरिटी’ या ग्रुपविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. आता अमित चांदोळे यांच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १२ तासांच्या चौकशीनंतर अमित चांदोळे यांना अटक करण्यात आली आहे. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय समजले जातात.

मंगळवारी ईडीने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयानं शोधमोहिम केली होती. टॉप्य ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली होती. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकार व डाॅक्टर यांच्यावरील होणारे हल्ले हे समाज स्वास्थ बिघडविणारे आहेत –  कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

News Desk

‘भाजपमधून बाहेर पडाल तर काय त्रास होतो हे दाखवायचं आहे’, भुजबळांचा भाजपवर वार

News Desk

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

swarit