मुंबई | राज्यात कोरोनाच्या संसर्गाने जनजीवन विस्कळित झाले. काही अंशी पूर्व पदावर येताना दिसत असले तरीही अजून पूर्णपणे सगळं नीट होण्यास नक्कीच वेळ जाणार. अशात कोरोनाची साथ येण्याआधी जिल्ह्याजिल्ह्यांमधून आमच्याकडे धरण हवे, अशी मागणी येत असे, पण कोरोनाने आमूलाग्र बदल घडवला. आता आमच्याकडे मेडिकल कॉलेज किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल द्या, अशी मागणी आमदार करताना दिसत आहेत. त्यामुळेच १२ जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज करण्याच्या प्रस्तावावर वैद्यकीय शिक्षण विभाग काम करत आहे. त्याशिवाय तीन जिल्ह्यांतल्या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव केद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
अमित देशमुख म्हणाले की, आम्ही विविध मॉडेलवर विचार करत आहोत. त्यासाठी पीपीपी धर्तीवर काही खासगी हॉस्पिटलना यात सहभागी करून घेता येईल का? टाटा कॅन्सर हॉस्पिटलसारखे मॉडेल विकसित करता येईल का? यावरही विभागाचे काम चालू आहे. प्रत्येकाला आपल्या जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी किंवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल हवे आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये येणारा खर्च सर्वसामान्य व गरीब रुग्णांना परवडत नाही. कोरोना काळात ज्या पद्धतीने मेडिकल कॉलेजचे महत्त्व ठळकपणे समोर आले. त्यानंतर, परिस्थिती बदलली आहे.
आता लोकप्रतिनिधींना मतदारसंघात धरण नाही झाले, तरी चालेल, पण मेडिकल कॉलेज पाहिजे असे वाटू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कायमस्वरूपी वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली पाहिजे, या मताचे आहेत. जिल्हा तेथे मेडिकल कॉलेज किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ही केंद्राचीही योजना आहे. त्यातूनही काही निधी मिळविण्याचा आमचा प्रयत्न असेल. भाजपचे राज्यातील आमदार त्यासाठी निश्चित मदत करतील, असेही देशमुख म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.