HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार 

पुणे | माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते यांचा शुभविवाह नुकताच पार पडला. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातपुते यांच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे आता राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीवन जगदाळे यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही माहिती सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिली आहे.

पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये अत्यंत थाटामाटात आमदार राम सातपुते यांचा विवाहसोहळा पार पडला होता. मात्र सातपुतेंच्या लग्नात पाहुण्यांची अफाट गर्दी लोटल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती. लग्न सोहळ्यातील फोटोमध्ये अनेक पाहुणे आणि नेते मंडळींनी तोंडाला मास्क लावला नसल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने गर्दी असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही बोजवारा उडाल्याचं दिसून आलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणजे हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी, कॉंग्रेसचा उपरोधिक टोला   

News Desk

“आता नैतिकतेच्या आधारावर अनिल देशमुखांप्रमाणे अनिल परबही राजीनामा देणार?”, कॉंग्रेसचा सवाल

News Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

News Desk