HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

राज्यपाल-मुख्यमंत्र्यांच्या पत्रव्यवहार वादावर अमित शाह नाराज

नवी दिल्ली । “राज्यपालांना आपल्या पत्रात काही वेगळे शब्द वापरता आले असते. काही शब्द टाळता आले असते”, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील धार्मिक स्थळे, मंदिर खुली करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते. या पत्रात राज्यपालांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वावर बोट ठेवले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना पत्रातून सडेतोड प्रत्युत्तर दिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधील हाच पत्रव्यवहार राजकीय वर्तुळात गाजतो आहे.

नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी महाराष्ट्रातील परिस्थिती आणि राज्यपाल-मुख्यमंत्री पत्रव्यवहार यावर भाष्य केले आहे. “तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिरस्कार होता. मग आता तुम्ही अचानक सेक्युलर झालात का?”, असा बोचरा सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. त्यावर, “राज्यपालांना त्यांच्या पत्रात काही शब्द टाळता आले असते, दुसरे शब्द वापरता आले असते”, असे अमित शहा यावेळी म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील भाषेवर अनेकांनी टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता खुद्द अमित शहांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. “मी ते पत्र वाचलं. त्यांनी जुन्या भाषणात काही संदर्भ दिले आहेत. मात्र, त्यांनी काही शब्दांची निवड करायला नको होती. राज्यपालांनी ते काही विशेष शब्द वापरायला नको होते. त्या शब्दांची निवड टाळायला हवी होती”, असे अमित शाह म्हणाले.

Related posts

प्रियकराने प्रेयसीला बाथरूममध्ये जिवंत जाळले.

News Desk

अखेर तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर

News Desk

भुसावळमध्ये गोळीबार, भाजपच्या नगरसेवकासह ४ जणांचा मृत्यू

News Desk